वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतून उमरगा शहरातील मुख्य रस्त्यावर स्ट्रीट लाईट पोल बसवणे व ३० महत्वाच्या चौकांमध्ये हायमस्ट लॅम्प बसवणे या कामांसाठी १ कोटी ५० लक्ष रुपये इतका निधी मंजूर केला असून या सर्व कामांचा रविवारी (दि.१३) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक व महादेव मंदिर याठिकाणी मा.खा.प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे-पाटील, शिवसेना नेते जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, माजी नगरसेवक सिद्रामप्पा चिंचोळे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, डॉ.उदय मोरे, नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोणे, संजय पवार, बालाजी पाटील, संदीप चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, सचिन जाधव, शाहूंराज माने, शरद पवार, योगेश तपसाळे,लिंगराज स्वामी, खयूम चाकूरे, आप्पासाहेब पाटील, अमर शिंदे, बाजार समितीचे संचालक हणमंत डावरगे, व्यंकट पाटील, बालाजी जाधव, महावीर कोराळे, कंत्राटदार प्रवीण जाधव, नगरपालिकेचे विद्युत अभियंता दिनेश राऊत आदी उपस्थित होते.
या निधीतून उमरगा शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकावर बसस्थानक ते श्रमजीवी महाविद्यालय पर्यंत स्ट्रीट लाईट पोल बसविण्यात येणार आहेत. व जिजाऊ चौक, शिवपुरी रोड, बाळासाहेब ठाकरे चौक, महादेव मंदिर समोर, मौलाना आझाद चौक हमीद नगर, समाज मंदिर समोर भीमनगर, झोपडपट्टी मध्यस्थानी, राजू कासार घराजवळ, प्रतिभा नगर, बसवेश्वर शाळेजवळ, अण्णाभाऊ साठे चौक, हुतात्मा गार्डन मध्यस्थानी, बिरदेव मंदिराजवळ, कक्कया महाराज चौक गौतम नगर, सय्यद बाशा दर्गा, समाज मंदिर कुंभार पट्टी, भारत नगर चौक, पोफळे दवाखाना आरोग्य नगर, इंदिरा चौक, गुंजोटी कॉर्नर रोड, जकापूर कॉलनी, गणेश मंदिर न्यू बालाजी नगर, गणेश चौक बालाजी नगर, साई मंदिर साई नगर, माउली मंदिर काळे प्लॉट, संतोषी माता मंदिरासमोर, बालाजी मंदिरासमोर वडार वस्ती , मोईन मस्जिद, कुंभारवाडा या ठिकाणी हायमस्ट लॅम्प बसवण्यात येणार आहेत.
No Result
View All Result
error: Content is protected !!