उमरगा –
उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे मंगळवारी (दि.१२) राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयासमोर साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच सुनिता पावशेरे, ग्रामपंचायत सदस्य मधूकर पाटील यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी देविदास पावशेरे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती देवून मनोगत व्यक्त केले. सरपंच सुनिता पावशेरे यांनी सर्वांना या प्रसंगी शुभेच्छा दिल्या. सिद्धार्थ गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कलाकार पाटील, सतीश पुजारी, शिवाजी रसाळ, पल्लवी डोणगावे, रसिका ढोणे, पद्मिन डोणगावे, पल्लवी पाटील, सोनिया पुजारी, लक्ष्मण भालेराव, उत्तम सरवदे, गोरख भंडे, अरुण डोणगावे, सिद्धार्थ गायकवाड, बुदधभुषण सुर्यवंशी, पंडीत मुसांडे, विठ्ठल पांचाळ, बालाजी गुरव,केरनाथ गायकवाड,हणमंत सुर्यवंशी, मारुती सुरवसे, यादव बिराजदार, तुकाराम घोटमाळे, प्रभाकर घोटमाळे, शरणप्पा जकेकुरे, किसन डिगुळे, राजाराम भांडेकर, भरत साळुंखे, शाम तळेकर, अरविंद दळवे, विठ्ठल दासमे आदी उपस्थित होते.