वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
एकता फाउंडेशन उस्मानाबाद व संस्कृती प्रतिष्ठान उस्मानाबाद
यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार २०२१ व रोटरी क्लब उमरगा यांच्या वतीने नेशन बिल्डर आवार्ड २०२१ मिळाल्याबद्दल लोहारा तालुक्यातील माकणी येथील गौरीशंकर करबसप्पा कलशेट्टी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते सोमवारी (दि.२५) सत्कार करण्यात आला.
लोहारा तालुक्यातील माकणी येथील शिक्षक गौरीशंकर करबसप्पा कलशेट्टी हे एक उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी एकता फाउंडेशन उस्मानाबाद व संस्कृती प्रतिष्ठान उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार २०२१ व रोटरी क्लब उमरगा यांच्या वतीने दिला जाणारा नेशन बिल्डर आवार्ड २०२१ कलशेट्टी यांना मिळाला आहे. त्याबद्दल कलशेट्टी यांचा माकणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर साठे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, माजी जि प सदस्य राहुल पाटील, दिपक जवळगे, गोविंदराव साळुंके, माकणीचे सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, गणेश गोरे आदी उपस्थित होते.