वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिवसेनेचे लोहारा तालुकाप्रमुख असलेले मोहन पणुरे यांची शिंदे गटाच्या उस्मानाबाद जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे बुधवारी (दि.१७) आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत सचिव संजय मोरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे. तालुकाप्रमुख मोहन पणुरे यांच्यासह शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत आमदार चौगुले यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात सामील झाले आहेत. मागील काही दिवसांपासून शिंदे गटाकडून आपला गट मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हाप्रमुखपदासाठी चाचपणी केली होती. अखेर मोहन पणुरे यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंबई येथील कार्यालयात मोहन पणुरे यांना जिल्हाप्रमुख (उमरगा, लोहारा, तुळजापूर) नियुक्तीपत्र देण्यात आले. तर लोहारा तालुकाप्रमुख पदी जगन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, बालाजी किणीकर, सचिव संजय मोरे यांच्यासह जगन्नाथ पाटील, अप्पासाहेब पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.