वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत नागरिकांना संवैधानिक नागरी हक्कांबाबत माहिती मिळावी यासाठी पथनाट्याचे माध्यमातून जनजागृती करण्यात आली. लोहारा शहरात बुधवारी ( दि. २७) हा कार्यक्रम घेण्यात आला.
लोहारा तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून दि. २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत लोहारा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात विविध जनजागरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून पंचायत समिती लोहारा, नगर पंचायत लोहारा यांच्या सहकार्याने, श्रीमती एन.एस.सराफ, दिवाणी न्यायाधीश लोहारा यांच्या संकल्पनेतून सास्तूर निवासी दिव्यांग शाळा व श्री शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी बुधवारी (दि.२७) लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांच्या संवैधानिक अधिकाराबाबत पथनाट्याच्या माध्यमातून जनजागरण केले. या कार्यक्रमासाठी लोहारा तालुका विधी समितीच्या अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश एन.एस. सराफ, गटविकास अधिकारी सोपान अकेले, निवासी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे, विस्तार अधिकारी विनोद पवार, लोहारा न्यायालयीन कर्मचारी जे. के. महामुनी, एस.व्ही. भोसले, लोहारा नगरपंचायतचे स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे, डाटा एन्ट्री ऑपरेटर नवनाथ लोहार, मतीन शेख यांची उपस्थिती होती. सदर पथनाट्यामध्ये गौरव करदोरे, प्रणिकेत स्वामी, इंद्रजित येणगे, गायत्री सुर्यवंशी, दिपाली घोसले, ओमकार जावळे, सुर्या शिंदे, महेश पवार, राधिका मरे, सोनाली बेळे, भाग्येश इस्लामपूरे, स्वप्नाली पूजारी, सत्यम मोरे, अलीम चौधरी, रोहन कदम, शिवानी खंदारे या दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी दिवाणी न्यायाधीश श्रीमती एन.एस.सराफ यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी शहरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.टी. नादरगे यांनी केले. सूत्रसंचालन गौरव करदोरे यांनी केले. पथनाट्याचे दिग्दर्शन व संगीत प्रविण वाघमोडे यांनी केले. तबल्याची साथ राजेंद्र स्वामी यांनी दिली. वेषभूषा शंकरबावा गिरी यांनी केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानोबा माने, डी.एस. सगर, गोरक पालमपल्ले, एन.सी.सुर्यवंशी, निशांत सावंत, सूर्यकांत कोरे यांनी परीश्रम घेतले. आझादी का अमृत महोत्सवाच्या औचीत्याने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये पूर्ण भारतभर जनतेमध्ये कायद्याचे ज्ञान पोहचवुन जनजागृती करून अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.