वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी हे तालुक्यातील मोठी एक मोठे गाव. मागील काही दिवसांपूर्वी माकणी गाव तालुक्यातील कोरोनाचे सर्वात जास्त ऍक्टिव्ह रुग्ण असलेले गाव म्हणून ओळखले जात होते. परंतु आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व नागरिकांच्या करण्यात आलेल्या उपाययोजना यामुळे माकणीची वाटचाल कोरोनामुक्तिकडे होत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत माकणी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यामार्फत विविध उपाययोजना राबवून कोरोनाचा शिरकाव गावात होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.

शासनाच्या मार्गदर्शक नियमावलीचे पालन करत गावात जनजागृती करण्यात आली. परंतु सुरुवातीला शहरी भागात आढळणारे कोरोनाचे रुग्ण हळूहळू ग्रामीण भागातही आढळून येऊ लागले. त्यात माकणी येथेही कोरोना बाधित रुग्ण आढळून येऊ लागले. मार्च महिन्या पासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जाणवू लागला. यावेळी गेल्या वर्षी पेक्षा अधिक वेगाने संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी माकणीतही रुग्ण संख्या झपाट्याने वाढत चालली होती. तालुक्यातील सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण संख्या असलेले गाव अशी ओळख काही दिवसांपूर्वी झाली होती. अशा परिस्थितीत काय करायचे, काय उपाययोजना करायच्या यावर विचार विनिमय करण्यात आला. त्याप्रमाणे गावात कोरोनाचा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, गावातील प्रमुख नागरिक, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी अनेकांनी पुढाकार घेतला. यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. गावातच लोकसहभागातून आयसोलेशन केंद्र उभारायचे निश्चित करण्यात आले. त्याप्रमाणे आयसोलेशन केंद्र सुरू झाले. तसेच गावात निर्जंतुकीकरण फवारणी, नियुक्त कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटी करून कुटुंब सर्वेक्षणाचे काम, यावेळी घरातील वयोवृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुचना देणे, कोणतेही आजार किंवा शारीरिक थकवा, त्रास जाणवत असल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याबाबत जनजागृती करत ग्रामपंचायत, आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात आल्या. तसेच अनावश्यक घराबाहेर पडू नये, नेहमी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा आदी आवाहन करण्यात आले. तसेच कोरोनाची साखळी रोखण्यासाठी कडक निर्बंध, गाव बंद ठेवणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करणे आदी कडक पावले उचलण्यात आली होती. परिणामी गावातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या पाच ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पुढील दोन दिवसांत तेही घरी येतील. मागील चार पाच दिवसांत करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन टेस्टचे अहवाल जवळपास निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे माकणीची वाटचाल कोरोनामुक्ती कडे होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

यासाठी माकणीचे सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, ग्रा.प.सदस्य दादासाहेब मुळे, गोवर्धन आलमले, सरदार मुजावर, अभिमन्यु कुसळकर, अँड.दादासाहेब जानकर, बाळू कांबळे, अच्युत चिकुंद्रे, कोरोना दक्षता समितीचे सदस्य पंडित ढोणे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, शिवाजी साठे, सिध्देश्वर साठे, संजय साठे, किशोर चिकुंद्रे, गोविंद साठे, गोविंद चव्हाण, गोपाळ ढोणे,ओमकार साठे,पोपट पवार, बालाजी साठे, उमेश कडले, सुभाष आळंगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी महादवाड, डॉ. आर. एस. माने, डॉ. संतोष मनाळे, डॉ. सिद्धेश्वर ताजवे, आरोग्य सहाय्यक यु. डी. काळे, के. ए. जाधव, एमपीडब्ल्यू राजमाने यांच्यासह आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
No Result
View All Result
error: Content is protected !!