वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हा निरिक्षक रमेश बारसकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.३१) लोहारा येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला.
लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी आमदार राहुल मोटे, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, ज्येष्ठ नेते नागन्ना वकील, गोविंदराव साळुंके, तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीच्या सुरुवातीला तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी आढावा सादर केला. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी यांनी आपापली मते मांडली. त्यानंतर लोहारा नगरपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची प्रभागनिहाय मते जाणून घेण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, शहराध्यक्ष आयुब शेख, किसान सेलचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, राजेंद्र कदम, तालुका कार्याध्यक्ष अमोल ओवांडकर, हाजी बाबा शेख, विनोद लांडगे, हेमंत माळवदकर, मिलिंद नागवंशी, गजेंद्र जावळे, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, माजी नगरसेवक गगन माळवदकर, प्रकाश भगत, दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, स्वप्नील माटे, बालाजी मेनकुदळे, ऍड. दादासाहेब जानकर, वामन भोरे, सचिन रणखांब, रवी राठोड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.