वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या शाखेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, किशोर साठे, व्यसनमुक्ती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संदीप तांबारे, तुषार वाघमारे, शब्बीर गवंडी, आयुब शेख, हाजी बाबा शेख, बाळासाहेब स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हा सरचिटणीस रियाज पठाण, दिव्यांग सेलचे लोहारा तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, जिल्हा उपाध्यक्ष शौकतअली बासुमिया मासुलदार, तालुका कोषाध्यक्ष किसन सिद्राम पवार उपस्थित होते. यावेळी महिला दिव्यांग सेल तालुकाध्यक्षपदी मंगल दशरथ गायकवाड, तालुका उपाध्यक्ष पदी शुभांगी दामोदर सितापुरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. दिव्यांग सेलचे शहराध्यक्ष उत्रेश्वर उपरे, सचिव योगावती थोरात, आदम शेख, श्रीमंत गरड, मधुकर कोळी यांच्यासह दिव्यांग बंधू, भगिनी उपस्थित होते.