वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा येथील रोटरी क्लबच्या गतवर्षाच्या अध्यक्षा कविता अस्वले, क्लबच्या डॉ. सुचेता पोफळे यांना रोटरी क्लब जुळे सोलापूर यांच्या वतीने दिला जाणारा हिरकणी पुरस्कार सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि रोटरी डिस्ट्रिक फर्स्ट लेडी एडवोकेट सविता मोतीपावले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 2020-21 या रोटरी वर्षात कोरोनाच्या संकट काळात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवताना दिलेल्या योगदानाबद्दल कविता अस्वले आणि वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना जनजागृती बद्दल डॉक्टर पोफळे यांच्यासह 11 जिल्ह्यातील निवडक महिलांना रोटरी क्लब जुळे सोलापूर यांच्या वतीने हिरकणी पुरस्कार सोलापूर येथील फडकुले सभागृहात आयोजित कार्यक्रमात देण्यात आला.
कोरोनाच्या आणि लॉकडाउनच्या काळात रोटरी क्लब उमरगाने 300 च्या वर उपक्रम केले. यामध्ये 25 निराधार महिलांना शिलाई मशीन तसेच सरकारी दवाखान्यात ऑक्सिजन मशीन आणि वेंटिलेटर मशीन, जलसंधारण पर्यावरण, रायला या शैक्षणिक उपक्रमांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल संपूर्ण 11 जिल्ह्यांमध्ये रोटरी क्लब उमरगाचा संतुलित क्लब म्हणून सन्मान केला आहे. या सर्व उपक्रमांमध्ये रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य आणि योगदान दिले आहे. या पुरस्काराबद्दल सर्वांनी सौ. अस्वले आणि डॉ. पोफळे यांचे अभिनंदन केले आहे.