वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने गाव तेथे शाखा आणि घर तेथे कार्यकर्ता या मोहिमेंतर्गत माझा गाव, माझी शाखा या अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील खेड व माकणी येथे युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घघाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने माझा गाव माझी शाखा या अभियानांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गावात युवक काँग्रेसच्या शाखा काढण्यात येत आहेत. बुधवारी (दि.२१) खेड व माकणी येथे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, विठ्ठलसाई कारखान्याचे संचालक शरणाप्पा पत्रिके, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी, तालुकाध्यक्ष योगेश राठोड, माजी सभापती सचिन पाटील, ॲड. विश्वनाथ पत्रिके, नागनाथ पत्रिके, रफिक तांबोळी, महेश माशाळकर, ब्रम्हानंद पाटील, खेडच्या सरपंच राजश्री कांबळे, ग्रापं सदस्य शरविन शेख, सचिन जाधव, प्रेमनाथ साठे, तात्याराव कांबळे, प्रभूलिंग बस्टे, निकेत पत्रिके, रमाकांत कांबळे, बालाजी वडजे, जगदिश पाटील, राजेंद्र शेख, सिध्देश्वर पाटील, गोपाळ गव्हाळे, किशोर चिकुंद्रे, व्यंकट साठे, ज्ञानेश्वर जाधव आदीसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.