वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने गाव तेथे शाखा आणि घर तेथे कार्यकर्ता या मोहिमेअंतर्गत माझा गाव, माझी शाखा या अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील सालेगाव, तावशीगड व सास्तुर येथे युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घघाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने माझा गाव माझी शाखा या अभियानांतर्गत विविध गावात युवक काँग्रेसच्या शाखा काढण्यात येत आहेत. शनिवारी (दि.६) लोहारा तालुक्यातील सालेगाव, तावशीगड व सास्तुर येथे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, तालुकाध्यक्ष योगेश राठोड, माजी सभापती सचिन पाटील, उद्योजक आबासाहेब साळुंके, जिल्हा सरचिटणीस गौस शेख, उपाध्यक्ष यशपाल कांबळे, महेश माशाळकर, बालाजी वडजे, धनराज मिटकरी, रब्बानी नळेगावे, राजू इंडे, राजु मुल्ला, संजय बिराजदार, बळीराम पाटील, शहबाज मुल्ला, साहिल मुल्ला, बालाजी कांबळे, तानाजी सरवदे, निहाल मुल्ला, नागाप्पा मुनाळे आदीसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.