लोहारा तालुक्यातील होळी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत आंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांनी अनोखा उपक्रम राबवत महिलांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने संगीतखुर्ची, बकेटमध्ये चेंडू टाकणे, डोळ्यावर पट्टी बांधून फोटोत टिकली लावणे, कप फुंकणे, अचुक रिंग फेकणे आदी खेळांचा समावेश होता.या कार्यक्रमाच्या प्रारंभी सरपंच सरोजा बिराजदार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक एस. डी. कारभारी, ग्रामपंचायत सदस्य केशव सरवदे, रेखा बाबळसुरे, शांताबाई राठोड, प्रदीप मोरे, करण बाबळसुरे, लक्ष्मण राठोड, ओम बिराजदार, दैवता सरवदे, सुषमा मडुळे, कविता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रिडा स्पर्धाचे पंच म्हणून सरपंच सरोजा बिराजदार, सुनिता गायकवाड, सुलभा गायकवाड यांनी काम पाहिले. त्यानंतर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी कार्यकर्त्या शशिकला गायकवाड यांनी केले. सुत्रसंचलन करून केशव सरवदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आंगणवाडी कार्यकर्त्या रागिणी जाधव, आयोध्या चव्हाण, कोंडाबाई कोळी, मदतनीस प्रभावती माने, निलाबाई कांबळे यांनी परिश्रम घेतले.