वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवस कमी होत चालली होती. परंतु तालुक्यातील धानुरी येथे रूग्ण वाढत चालल्याने तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी ( दि. १८) आलेल्या अहवालानुसार तालुक्यात ४३ रुग्णांची भर पडली आहे. त्यातील ३० जण धानुरीतील आहेत.
लोहारा तालुक्यात मागील काही दिवसांतील अहवाल पाहिले तर रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून येत होते. परंतु बुधवारी पासून तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी (दि १८) आलेल्या अहवालानुसार तालुक्यात ४३ रुग्णांची भर पडली आहे. त्यात रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये धानुरी ३०, जेवळी १, हिप्परगा ३, भातागळी ६ असे एकूण ४० तर आरटीपीसीआर मध्ये सालेगाव, माकणी , सास्तुर येथील प्रत्येकी १ असे एकूण ३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. लोहारा तालुक्यातील इतर गावातील रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी धानुरी गावातील संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सद्यस्थितीत धानुरी गावात ९६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मागील अनेक दिवस शासनाने कडक निर्बंध लावले होते. सध्या त्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे, स्वतःची व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
No Result
View All Result
error: Content is protected !!