वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाची बैठक रविवारी दि.३ ऑक्टोबर रोजी पार पडली. मंडळाचे माजी अध्यक्ष हरी लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अध्यक्षपदी अक्षय विरुधे, उपाध्यक्षपदी श्रीकांत तिगाडे तर सचिवपदी अक्षय लोहार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
लोहारा शहरात मागील ४८ वर्षांपासून मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या नऊ दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु मागील वर्षी कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर नवरात्र महोत्सव साधेपणाने साजरा केला होता. या वर्षीही शासनाने दिलेल्या नियमावली नुसार नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
या बैठकीत पुढीलप्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आली. खजिनदार राहुल विरुधे, प्रशांत रेणके, कार्याध्यक्ष राहुल रेणके, कृष्णा विरुधे, प्रसिद्धी प्रमुख राहुल गायकवाड, सागर रेणके यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रशांत लांडगे, सुनील देशमाने, बाळु माळी, प्रशांत जाधव, गणेश खबोले, श्रीशैल्य स्वामी, दत्ता स्वामी, सुनील ठेले, नागनाथ जाधव, प्रशांत काळे, बाळु माशाळकर, अनिल ठेले, नितीन पवार, बाळु पाटील, अंबादास विरुधे, मंगेश बनशेट्टी, बाबा जाधव, चेतक पवार, सचिन जाधव, संजय विरुधे, नागनाथ लोहार, प्रेम लांडगे, मुकुंद पवार, सुरज लोहार आदींच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या.