वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथे युनिव्हर्सल मार्शल आर्ट्स जिम्नॅशियम व डी.एस स्पोर्ट्स अकॅडमी लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.२७) कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आली. यावेळी लातूरचे कराटे एक्सामिनर हेमा जायभाय व चीफ कोच बाबाजी जायभाय तसेच डी.एस. स्पोर्टस अकॅडमी लोहाराचे प्रमुख प्रशिक्षक दयानंद स्वामी यांच्या निरिक्षणाखाली परीक्षा संपंन झाली. यावेळी डी.एस स्पोर्टस अकॅडमी लोहारा येथील ११ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा पवार, ओम चिकटे, पार्थ शितोळे, यश जाधव, स्वेता चपळे, ओंकार पवार, तनिष्का स्वामी, प्रणव शेवाळे, आदित्य कोकाटे, भक्ती कोकाटे, शिवम जाधव आदींचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. लोहारा शहरातील बसवेश्वर मंदिर या ठिकाणी ही परीक्षा घेण्यात आली.