वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कुल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (दि.२९) लोहारा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी लोहारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. नरवडे, पोलीस उपनिरीक्षक ए. आर. माने, पोलीस कॉन्स्टेबल एम. एस. जगताप, नवगिरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. नरवडे यांनी विदयार्थ्यांना महाविद्यालय परिसरात किंवा रोडवर, बसस्थानक या ठिकाणी मुलींना त्रास देऊ नये. तसे कोणी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक ए. आर. माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलींना किंवा मुलांना कोणी त्रास दिल्यास त्याची तक्रार कोणालाही न घाबरत करावी असे आवाहन केले.
नवगिरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना लग्नाच्या वयाबदल मार्गदर्शन केले. तसेच एम. एस. जगताप यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईमबद्दल मार्गदर्शन केले. मोबाइलचा गैरवापर केल्यास कोणती कारवाई होते याबद्दलही सांगितले. तसेच सायबर क्राईम, रोडरोमिओंचा त्रास इत्यादीबद्दल तक्रार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन शिंदे यांनी केले. यावेळी बालाजी जाधव, प्रा. आर. सी. आष्टेकर, प्रा. एल. पी. कुलकर्णी, प्रा. डी. आर. साठे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.