वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील चार ते पाच महिन्यांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय पाच जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये ओबीसींना आरक्षण नसल्यामुळे ओबीसी उमेदवारांची बिकट परिस्थिती झाली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण महत्त्वाचे आहे. यासाठी आपण सर्वांनी लढा उभा केला पाहिजे असे प्रतिपादन ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले आहे.
ओबीसी आरक्षणासाठी ओबीसी संघर्ष यात्रा तुळजापूर येथून सुरू झाली आहे. या यात्रेचे गुरुवारी (दि. ७) लोहारा शहरात आगमन झाले. यावेळी लोहारा शहर व तालुक्यातील ओबीसी समाजाकडून रथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक अविनाश माळी, बांधकाम व अर्थ सभापती गौस मोमीन,नगरसेवक जालिंदर कोकणे, माजी नगरसेवक अभिमान खराडे, नगरसेवक श्रीनिवास माळी, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, काँग्रेस अल्पसंख्याकचे रौफ बागवान, नगरसेवक शरद पेठकर निलंगा, बाळासाहेब पाटील, इक्बाल मुल्ला, रिपाई रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी प.स.सदस्य दिपक रोडगे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, श्रीशैल्य स्वामी, महमद हिप्परगे, राजु माळी, उमेश देवकर, सोमनाथ भोजने, महेश माळी, शंकर फुलसुंदर, बजरंग माळी, अयुब मुल्ला, गणेश माळी, सुग्रीव क्षिरसागर, अशोक काटे, तानाजी पाटील, अशोक माळी,
मारूती रोकडे, बाळासाहेब चिखलकर, अतुल क्षिरसागर, शिलवंत क्षिरसागर, संदीप माळी, अमोल माळी, राम क्षीरसागर, विलास फुलसुंदर, सौदागर गोरे, शाम माळी, धोडीराम माळी, महेश माळी, राहुल माळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.यावेळी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ५२ टक्के असलेल्या ओबीसी समाजाला सामाजिक समतोल आला नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे यासाठी सर्वांनी या लढ्यात सहभागी होणे आवश्यक असल्याचे रमेश बारसकर यांनी सांगितले.