शिवसेनेचे ब्रिद 80 टक्के समाजकारणाचे आहे, त्यामुळे पक्षाच्यावतीनेही त्यांना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे. शिवसेनेने ही जबाबदारी घेत या मुलांचे पालकत्व स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. युवासेनेचे प्रमुख मा.ना.आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त या प्रत्येक कुटुंबाना एक लाख रुपये मुदत ठेव पाल्यांच्या नावे केली आहे. ही रक्कम त्यांच्या भविष्यासाठी उपयोगी ठरावी म्हणुन मुदतठेव स्वरुपात ठेवण्यात आली आहे. पुढील काळात त्यांच्यासोबत राहुन त्याना आधार देण्यासाठी शिवसेना त्यांच्यासोबत कायमस्वरुपी राहणार आहे.