तुळजापूर येथील पी.एम श्री नवोदय विद्यालयात गुरुवारी (दि.९) सामाजिक शास्त्र विभागाचे डॉ. किशोर चौधरी सर ,श्री. चक्रपाणि गोमारे सर यांच्या समन्वयातून यशस्वीरित्या बालसंसदेचे आयोजन करण्यात आले होते.
सातवी व आठवी वर्गातील मुलामुलींनी प्रति संसदेचा उत्कृष्ठ, देखणा देखावा आपल्या सुंदर सादरीकरणातून जिवंत केला होता. लोकसभा सभापती, उपसभापती, प्रधानमंत्री, गृहमंत्री, शिक्षामंत्री, संसदीय सचिव, मार्शल,विदेश प्रतिनिधी अश्या अनेक भुमिका मुलामुलींनी उत्कृष्ठ रित्या पार पाडल्या. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. भारतीय संसद हि जगातील सर्वात मोठी जनहित कचेरी आहे.यातील शपथविधी, प्रश्र्नकाल, अविश्वास प्रस्ताव, बिल पास करणे, त्यावरील चर्चा, शून्यकाल, ध्यानाकर्षण प्रस्ताव, विदेश प्रतिनिधींचे स्वागत अश्या संसदेतील कार्यप्रणालीच्या माहितीमुळे भावी भारताचे नागरिक घडतात आणि त्यांना लोकशाहीची माहिती होते असे सुचक प्रसंशनीय मत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे, तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख, विख्यात इतिहास संशोधक डॉ. सतिश कदम सर यांनी व्यक्त केले. त्यांच्या सोबत आलेले श्री.कदम यांनी असा प्रतिरूप संसदेचा कार्यक्रम त्यांच्या वरिष्ठ महाविद्यालयात होण्याची इच्छा ही व्यक्त केली.
विद्यालयाचे प्राचार्य श्री. के. वाय. इंगळे यांनी अश्या कार्यक्रमातून भारतीय राज्यव्यवस्थेचे ज्ञान होते आणि भविष्यात चांगले लोकप्रतिनिधी कसे व्हावेत, त्यांनी सुसभ्य संसद कशी चालवावी याचे धडे मिळतात आणि या लहानांपासून मोठ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि खरी मुर्त, सुसभ्य लोकशाही भारतात नांदवावी हे सांगितले. बालसंसदेच्या आयोजनासाठी,सजावट कार्य श्री. बस्वराज के., फोटोग्राफी आणि विडिओ यांत्रिकी सहाय्य श्री निषाद भुते, कक्ष उपलब्धि श्री यश पाटिल, मुलींचे पोशाख श्रीमती एस डी वाघमारे , श्रीमती विद्या जाधव,स्वागत साहित्य श्री.हरी जाधव ,खानपान सहयोग श्री रामकुमार शुक्ला यांनी यथायोग्य सहकार्य केले.