Vartadoot
Thursday, August 20, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

ग्रामीण भागातील रूग्णालयांना वैद्यकीय यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्या – आ.सतीश चव्हाण यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी – आ. चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली लोहारा, उमरगा येथील हॉस्पिटलमध्ये पाहणी

admin by admin
04/05/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ग्रामीण भागातील उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी वैद्यकीय यंत्रसामुग्री व आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली आहे.


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आ. सतीश चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 4) लोहारा येथील ग्रामीण रूग्णालय, उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालय, लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था आदी ठिकाणी भेटी देऊन कोरोनाच्या सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला. लोहारा तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. लोहारा ग्रामीण रूग्णालयाकडे आवश्यक वैद्यकीय यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने येथील गंभीर रूग्ण तुळजापूर, उस्मानाबाद याठिकाणी उपचारासाठी जात आहेत, मात्र त्याठिकाणी देखील व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे आ. सतीश चव्हाण यांच्या लक्षात आले. आ. सतीश चव्हाण यांनी लागलीच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी फोनव्दारे चर्चा करून येथील परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. याठिकाणी ऑक्सिजन लिक्विड प्लांट, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स, बायपॅप मशिन्स आदी वैद्यकीय यंत्रसामुग्रीची नितांत गरज असून ती उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सुनील केंद्रेकर यांनी देखील संबंधित अधिकार्‍यांशी बोलून लवकरच हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आ. सतीश चव्हाण यांना सांगितले. लोहारा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे यांना सदरील यंत्रसामुग्रीचा प्रस्ताव तातडीने जिल्हा रूग्णालयाकडे सादर करण्याची सूचना आ. सतीश चव्हाण यांनी केली. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, तहसीलदार संतोष रूईकर, सतीश इंगळे, डॉ. काळे आदींची उपस्थिती होती.


उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयास देखील आ. सतीश चव्हाण यांनी भेट देऊन तालुक्यातील कोविड रूग्ण संख्या, उपलब्ध यंत्रसामुग्री व साहित्य, आवश्यकता असलेली यंत्रसामुग्री, डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांची संख्या आदींचा आढावा घेतला.

तसेच ईदगाह फंक्शन हॉल येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला आ. सतीश चव्हाण यांनी भेट देत कोविड बाधित रूग्णांशी संवाद साधून त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार तालुकाध्यक्ष संजय पवार, प्रा. सतीश इंगळे शहराध्यक्ष ख्वाजा मुजावर, जगदीश सुरवसे, फयाज पठाण उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आ. सतीश चव्हाणजिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदारलोहारा उमरगा हॉस्पिटल भेटी व पाहणी
Previous Post

माकणी येथे सुरु करण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्राला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने २५ बेडची मदत – समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांनीही केली पाहणी

Next Post

आमदार ज्ञानराज चौगुले व किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत लोहारा तालुक्यातील जेवळी येथील कोविड आयसोलेशन सेंटरचा शुभारंभ

Related Posts

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

16/08/2026
भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ
आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

02/08/2026
प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
Next Post

आमदार ज्ञानराज चौगुले व किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत लोहारा तालुक्यातील जेवळी येथील कोविड आयसोलेशन सेंटरचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's