Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

ठाकरे सरकारच्या योजना सर्वसामान्यांच्या हितासाठीच – आमदार ज्ञानराज चौगुले – उमरगा तालुक्यातील कोराळ येथे शिवसंपर्क अभियानाचा समारोप

admin by admin
24/07/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार दि.12 जुलै ते 24 जुलै या काळात राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. उमरगा-लोहारा तालुक्यातही हे अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात आले असून या अभियानाचा शनिवारी (दि.24) उमरगा तालुक्यातील कोराळ येथून समारोप करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात युवा सेनेच्या 51 शाखा स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानूसार आज कोराळ ता. उमरगा येथे युवा सेनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी आ. ज्ञानराज चौगुले यांनी उपस्थित पदाधिकारी, शिवसैनिक व नवनिर्वाचित युवा सेना कार्यकारिणी यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ठाकरे सरकारच्या सर्व योजना केवळ सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्याच असून या अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन शासनाची कर्जमाफी योजना, कोरोना काळातील कार्य, परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रु. अनुदान, गरजूंसाठी शिवभोजन, आदी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी. तसेच लोकांच्या वैयक्तिक व गावागावातील प्रमुख समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे तसेच वरिष्ठांकडे मांडाव्यात. गावातील किती नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले आहे याबाबत माहिती संकलित करून जास्तीत जास्त लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.या कार्यक्रमास युवा नेते किरण गायकवाड, बाजार समितीचे सभापती मोहियोद्दिन सुलतान, शेतकरी सेना तालुकाप्रमुख बलभीम येवते, विधानसभा अध्यक्ष शरद पवार, युवा सेना तालुकाप्रमुख अजित चौधरी, विभागप्रमुख विलास भगत, प्रदीप मदने, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, उपतालुकाप्रमुख संदीप जगताप प्रशांत पोचापुरे, किरण दासमे, बाबू शेख, श्याम माडजे, विक्रम दासमे, अशोक पवार, प्रकाश जंगाले, बालाजी सुरवसे महाराज, धनराज गाडेकर, दत्ता दासमे, दगडू जंगाले आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेशिवसेना
Previous Post

छावा संघटना काढणार लोकमंगल कारखान्यावर मोर्चा – ऊसाचे बिल लवकर देण्याची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

डॉ. शामप्रसाद मूखर्जी समर्थ बूथ अभियान अंतर्गत लोहारा शहरात भाजपाची मंडल निहाय शक्तिकेंद्र प्रमुखांची बैठक संपन्न

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

डॉ. शामप्रसाद मूखर्जी समर्थ बूथ अभियान अंतर्गत लोहारा शहरात भाजपाची मंडल निहाय शक्तिकेंद्र प्रमुखांची बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's