Vartadoot
Wednesday, July 29, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मोदीसाहेबाच्या आर्शिवादानेच सोयाबीनचे दर पडले – शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मोदी सरकारवर घणाघात

admin by admin
22/09/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
देशाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांच्या आर्शिवादानेच सोयाबीनचे दर कोसळत असुन केंद्र सरकारनं १२ लाख टन जनुकीय बदल केलेल्या सोयाबीन डीओसीच्या आयातीला दिलेली परवानगी शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असल्याचा घणाघात खासदार ओमराजे निंबाळकर यानी केला आहे. मोदी सरकारच्या अनेक निर्णयामुळे शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागत आहे, हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताऐवजी व्यापाऱ्यांचा प्राधान्याने विचार करत असल्यामुळेच शेतकऱ्यावर ही वेळ आल्याचे खासदार ओमराजे यांनी यावेळी सांगितले आहे.

सोयाबीन दरामध्ये होत असलेली घट पाहता सोयाबीन उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी दहा ते अकरा हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीनचे भाव आता सहा हजारावर आले आहेत. एका बाजुला यंदा अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मोठा फटका बसला असुन अगोदरच उत्पन्नात घट झाली आहे. एकरी उतारा घटल्याने अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दराच्या घसरणीचाही तोटा होत आहे. सोयाबीन पिकातून उत्पन्नाची आशा असतानाच केंद्र सरकारने आयातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच हिरावुन घेतल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. सोयाबीनचे भाव यंदा दहा हजाराच्यावर राहतील असा अंदाज व्यक्त होत होता. त्याप्रमाणे भावही चढे राहिले होते. जेव्हा केंद्राने आयातीचा निर्णय जाहीर करण्याचा विचार चालु केला त्याच दिवसापासुन आतापर्यंत हळुहळु दर कोसळत असल्याचे चित्र आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी टाकण्याचे महापाप भाजपच्या सरकारने केले आहे. हे पाप देशाच्या कोणत्याही पवित्र नदीत धुवुन निघणार नाही असा टोलाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लगावला आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: खासदार ओमराजे निंबाळकर
Previous Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथे दोन व्दारयुक्त सिमेंट बंधारा बांधकाम करावे – आ. सतीश चव्हाण यांनी केली मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे मागणी

Next Post

शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आयोजित गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे शनिवारी बक्षिस वितरण – आकांक्षा ज्ञानराज चौगुले, शामलताई वडणे यांची राहणार प्रमुख उपस्थिती

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आयोजित गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे शनिवारी बक्षिस वितरण - आकांक्षा ज्ञानराज चौगुले, शामलताई वडणे यांची राहणार प्रमुख उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's