Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
25/03/2025
in लोहारा तालुका
A A
0
सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा
Ad 10

“टीबी हरेगा, देश जितेगा” हा विश्वास देत लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात सोमवारी (दि.२४) जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला.
तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. नियमित उपचार, सकस आहार, योगासने व प्राणायामव्दारे क्षयरोग संपूर्ण बरा होतो व योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण कुटुंब क्षयरोग पासून मुक्त राहते असे प्रतिपादन प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी यावेळी बोलताना केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आनम संस्थेच्या सहकार्याने क्षयरोग उपचार घेत असलेल्या ३० रुग्णांना पोषण आहार कीट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, स्त्रीरोग तज्ञ डॉ.भक्तराज ठोंबरे, दंतरोग तज्ञ डॉ. संगीता चोरमले यांची प्रमुख उपस्थिती होती.


जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित बनसोडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सास्तूर येथे जागतिक क्षयरोग दिनाचे आयोजन करण्यात आले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीची सुरुवात प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, स्त्रीरोग तज्ञ डॉ.भक्तराज ठोंबरे, छातीविकार तज्ञ डॉ.अतिफ पटेल, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश गुंजोटे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. होय आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो, प्रतिज्ञा करा तरतूद करा सेवा द्या, हे या वर्षाचे क्षयरोगा संबधीचे ब्रिदवाक्य आहे. डॉटसचा अवलंब करूया क्षयरोगावर मात करूया, डॉटस उपचार प्रभावी खरा क्षयरोग करतो हमखास बरा. क्षयरोग उपचार घेतला अर्धवट तर पुन्हा उफाळून येईल क्षयरोगाचे संकट या व अशा इतर घोषणांनी सास्तूर परिसर दुमदुमून गेला. रॅली नंतर क्षयरोग दुरीकरण प्रतिज्ञा घेण्यात आली व क्षयरोगा संबंधी जनजागृती करण्यात आली. तसेच क्षयरोग बद्दल उपस्थिताना संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. “क्षयरोग मुक्त भारत व क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची शपथ सर्वांनी घेतली.
जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून डॉटस क्षयरोग उपचार चालू असलेल्या ३० रुग्णांना सकस आहारासाठी अन्नधन्य व इतर किटचे वाटप प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या किट मध्ये गहू, तांदुळ, डाळी, साखर, तेल, शेगदाणे, अंगाचे साबण, कपड्याचा साबण, दुध पावडर, चहा पावडर इत्यादी दिले जाते. दिवसभर क्षयरोग संशयित रुग्णांची बेडका तपासणी मायक्रोस्कोप व्दारे तसेच क्ष-किरण तपासणी करण्यात आली. या जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोहारा उमरगा एस.टी.एल.एस. ज्ञानेश्वर बिराजदार व एस.टी.एस नागेश ढगे तसेच स्पर्श रुग्णालयाचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जागतिक क्षयरोग दिनस्पर्श रुग्णालय सास्तुर
Previous Post

माकणी येथील उच्चशिक्षित कुटुंब घडवणारी संघर्षशील आणि प्रेरणादायी माता ‘आदर्श माता – आदर्श नारी’ पुरस्काराने सन्मानित

Next Post

धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश

धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's