लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास शनिवारी (दि.२१) आ. विक्रम काळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यालयाची माहिती जाणून घेतली.
तालुक्यातील सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास शनिवारी (दि.२१) आ. विक्रम काळे यांनी भेट दिली. यावेळी श्री शांतेश्वर शिक्षण समितीचे अध्यक्ष मुरली पवार यांनी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रम काळे यांचा सत्कार केला. तसेच मुख्याध्यापक आर. व्ही. मुगळे यांनी चालू शैक्षणिक वर्षातील पट, आठवडी परीक्षा, प्रयोगशाळा, ग्रंथालय याची माहिती दिली. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून ग्रंथालयासाठी ३५ हजार रुपयांची पुस्तक देण्याचे आश्वासन आ. विक्रम काळे यांनी यावेळी दिले. येत्या दि.३० जूनला प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील माने हे सेवानिवृत्त होत असल्यामुळे आ. काळे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख मदन पाटील यांनी तर एस.एच. पवार यांनी आभार मानले.
