Vartadoot
Thursday, June 11, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

मुख्य संपादक by मुख्य संपादक
11/06/2026
in लोहारा तालुका
A A
0
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
Ad 10

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (सय्यद) व वडगाववाडी येथे झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शिलाई मशीन, सायकल, शेळ्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

हॅलो मेडिकल फाउंडेशन, अणदूर व स्विसएड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा झेप किशोरी विकास प्रकल्प जून २०२५ पासून लोहारा व तुळजापूर तालुक्यातील ३० गावांमध्ये कार्यरत आहे. १३ ते १७ वयोगटातील मुलींच्या लिंगभाव दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडवून आणणे, निर्णयक्षमता वाढवणे, जीवन कौशल्ये विकसित करणे तसेच बालविवाह रोखण्यासाठी मुलींना सक्षम बनवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी पालक, युवक व शासकीय यंत्रणांचा सहभाग वाढवून जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचे काम प्रकल्पामार्फत केले जात आहे. प्रकल्पांतर्गत गावपातळीवरील सखींच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून गरजू व असुरक्षित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी उत्पन्नवाढीची साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. याअंतर्गत लोहारा तालुक्यातील हिप्परगा (सय्यद) व वडगाववाडी येथे शेळ्या, शिलाई मशीन, सायकल व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.


हिप्परगा (सय्यद) येथील चार मुलींना शेळ्या व एका मुलीला शिलाई मशीन देण्यात आले. तर वडगाववाडी येथील एका मुलीला शेळी तसेच तीन मुलींना सायकल व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या मदतीमुळे मुलींचे शिक्षण सुरू राहण्यास व त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमासाठी स्विसएड संस्थेच्या स्नेहा गिरिधारी, प्रकल्प अधिकारी जितेंद्र सावकर, हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी अहंकारी, प्रकल्प संचालक डॉ. क्रांती रायमाने, प्रकल्प समन्वयक नागिनी सुरवसे, किशोरी सहाय्य समितीचे सदस्य दिनकर गाढवे व जावेद शेख, प्रकल्प अकाउंटंट मुन्नाबी इनामदार, डाटा कलेक्टर मिराज नदाफ तसेच पर्यवेक्षिका रत्नमाला खरोसे, सुमती कानडे, शीला भोजने, पल्लवी गायकवाड, वडगाववाडी येथील सखी हसीना शेख व सय्यद हिप्परगा येथील सखी शबनम कारभारी यांनी सहकार्य केले. यावेळी सय्यद हिप्परगा व वडगाववाडी येथील ग्रामपंचायत अधिकारी आशिष गोरे, प्रतिष्ठित नागरिक श्रीशैल ओवांडे, अंगणवाडी कार्यकर्त्या हसीना कारभारी, सरपंच सोनाली गाडेकर, अनिता गिराम व सुरेखा गिराम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही गावांतील मुलींच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी आशिष गोरे यांनी झेप किशोरी विकास प्रकल्पाच्या कार्याचे विशेष कौतुक करून संस्थेचे व प्रकल्पाशी संबंधित सर्वांचे आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहाराहॅलो मेडिकल फाउंडेशन
Previous Post

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप

Related Posts

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप
कृषी

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप

10/06/2026
मुर्षदपूर येथील ग्रामपंचायत मध्ये २०२५-२६ या कालावधीत झालेल्या विकास कामाची चौकशी करण्यात यावी – निवेदनाद्वारे बीडीओ कडे केली मागणी
लोहारा तालुका

मुर्षदपूर येथील ग्रामपंचायत मध्ये २०२५-२६ या कालावधीत झालेल्या विकास कामाची चौकशी करण्यात यावी – निवेदनाद्वारे बीडीओ कडे केली मागणी

07/06/2026
शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम काढण्याबाबत आदेश द्यावेत; प्रगती घोटाळे यांनी साखर आयुक्तांकडे केली मागणी
लोहारा तालुका

शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम काढण्याबाबत आदेश द्यावेत; प्रगती घोटाळे यांनी साखर आयुक्तांकडे केली मागणी

07/06/2026
लोहारा तालुक्यातील पाच शिक्षक राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
लोहारा तालुका

लोहारा तालुक्यातील पाच शिक्षक राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

06/06/2026
तावशीगड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
लोहारा तालुका

तावशीगड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

02/06/2026
लोहारा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी, रक्तदान शिबिरात २२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
लोहारा तालुका

लोहारा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी, रक्तदान शिबिरात २२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

01/06/2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's