Vartadoot
Friday, July 31, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

मुख्य संपादक by मुख्य संपादक
16/06/2026
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
Ad 10

लोहारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
पहिल्याच दिवशी शाळेला भेट देण्यासाठी गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड उपस्थित होते. शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरी लोखंडे होते. गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अमीर हमजा खुटेपड, सदस्य जसवंतसिंह बायस, ज्योती स्वामी, सुनीता लोहार, बाबा शेख, दादा मुल्ला, पत्रकार अब्बास शेख, गिरीश भगत, गणेश खबोले, मुख्याध्यापक दत्तात्रय फावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये जसवंतसिंह बायस यांनी शाळेच्या एकूण कामकाजाची माहिती दिली. शाळेमध्ये असणाऱ्या भौतिक सुविधा, वर्षभर घेण्यात येत असणारे सहशालेय उपक्रम, गुणवत्ता याविषयी माहिती दिली. गटविकास अधिकारी गायकवाड यांनी स्पर्धा परीक्षा, गणित, विज्ञान, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, पालकांनी मुलांना मोबाईल वापरण्यास देऊ नये असे सांगितले.
नवागत इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प

देऊन पाठ्यपुस्तके वितरण करून व त्यांना गोड शिरा खाऊ देण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी दुपारच्या भोजनामध्ये सर्व मुलांना गोड पदार्थ म्हणून शिरा वाटप करण्यात आला. आजच्या दिवशी फुगे लावून व इतर साहित्य वापरून शाळेची सजावट करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पांढरे यांनी तर बालाजी मक्तेदार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश अंबुरे, संजय संदिकर, बालाजी यादव, अण्णाराव पांढरे, अनंत सुतार, संतोष माळवदकर, रमेश बनसोडे, आयुब तांबोळी, शफिक गवंडी, प्रमोद सरवदे, दयानंद क्षीरसागर, संजय बोरसुने, रेखा नारायणकर, सुरेखा कंठीकर, उषा बर्डे, यास्मिन तांबोळी, अर्चना साखरे, परवीन पठाण, तसेच कलाशिक्षक उमेश गिराम, क्रीडा शिक्षक खंडू शिवकर, कार्यानुभव शिक्षक चिदानंद जट्टे व सेवक विकास कोकणे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी पालक, माता भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राज्यगीताने करण्यात आली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: प्रवेशोत्सवलोहारा
Previous Post

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

Next Post

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's