Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

सोमवारी (दि.६) १८ वर्षांच्या पुढील नागरिकांना मिळणार कोविशिल्ड लस – कास्ती (खुर्द), माकणी, जेवळी अचलेर येथे होणार लसीकरण

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यात सोमवारी दि. ६ सप्टेंबर रोजी चार केंद्रावर १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. तसेच ज्यांना पहिला डोस घेऊन किमान ८४ दिवस झाले आहेत अशांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द, माकणी, जेवळी, अचलेर या चार ठिकाणी लसीकरण होणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. या केंद्रावर केवळ १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच ज्या नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आहेत अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये. लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत आहे. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रथम लसीकरण करण्यात येणार आहे. यावेळी लसीकरण केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.\"\"

Tags: कोविशील्ड लस
Previous Post

हराळी ग्रामपंचायतीच्या वतीने एपीआय काकडे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सूर्यवंशी यांचा सत्कार

Next Post

महादेव कारभारी यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

महादेव कारभारी यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!