वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी (दि.२) लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. यावेळी प्रधानमंत्री किसान योजना, आयुष्यमान भारत योजनेसाठी आधार कार्ड प्रमाणीकरण, अतिक्रमण नियमाकुल करणे आदीविषयी सूचना दिल्या. यावेळी लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे, सरपंच यशवंत कासार, उपसरपंच राजवर्धन पाटील, महेश स्वामी यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.