Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरास सुरुवात

मार्डी येथे २९ जानेवारी पर्यंत चालणार शिबीर

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ्त्रपती संभाजीनगर व शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालय लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तालुक्यातील मार्डी येथे बालविवाहमुक्त भारत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा व शंकरराव जावळे यांच्या प्रतिमा पूजनाने व फित कापून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे हे होते. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांनी बालविवाह रोखणे अत्यंत महत्वाचे आहे, मुलीचे लग्नाचे वय हे १८ वर्ष पूर्ण व मुलाचे वय हे २१ वर्ष पूर्ण झाले पाहिजे असे मत मांडले. या कार्यक्रमासाठी मर्गदर्शक म्हणून बालाजी मक्तेदार उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे असे मत व्यक्त केले.

\"शिबिर\"

शिवाजी कदम यांनी विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होण्यासाठी महाविद्यालयाची भूमिका महत्वाची आहे असे मत मांडले. प्रा. डॉ. मनोज सोमवंशी यांनी प्रास्ताविक करीत असताना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व विशद केले. व महाविद्यालयातर्फे या शिबिरामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची माहिती याप्रसंगी व्यक्त केली. ॲड. दादासाहेब पाटील (कायदेविषयक सल्लागार) यांनी बालविवाह रोखणे ही काळाची गरज आहे असे मत मांडले.

\"शिबीर\"
दि. २३ जानेवारी ते २९ जानेवारी पर्यंत हे शिबीर चालणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रतापराव माने, ॲड. अडसूळ, नरदेव कदम, अप्पासाहेब पाटील, श्रीमंत पाटील, शरद कदम, अजित आष्टे, दत्ता देवकर, योगेश देवकर, आरिफ पठाण, मुख्याध्यापक बी. बी. भोसले, राम कदम, महादेव मिसाळ, किरण पाटील, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी राजोळे, प्रा. भैरवनाथ मोटे, महाविद्यालयातील प्रा. डॉ. विनायक पाटील, प्रा. डॉ. रामहरी सूर्यवंशी, प्रा. डॉ. सुदर्शन सोनवणे, प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड, प्रा. डॉ. रामेश्वर धप्पाधुळे, प्रा. डॉ. विनोद आचार्य, प्रा. डॉ. सूर्यकांत बिराजदार, डॉ. संदीप कोरेकर, प्रा. नितीन आष्टेकर, प्रा. डॉ. शिवाजी कदम, मनोज पाटील, डॉ. शिरीष देशमुख, बालाजी सगर, नंदकिशोर माने, प्रवीण पाटील, संजय फुगटे, प्रकाश राठोड, परमेश्वर कदम, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील बहिरे यांनी तर प्रा. दत्ता कोटरंगे यांनी आभार मानले.

Tags: राष्ट्रीय सेवा योजना शिबिरशंकरराव जावळे पाटील महाविद्यालय
Previous Post

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या पोलीस चौकीचे भूमिपूजन

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे दिव्यांगांनी केले मतदारांचे जनजागरण ; जनजागृती रॅली व पथनाट्याचे आयोजन

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे दिव्यांगांनी केले मतदारांचे जनजागरण ; जनजागृती रॅली व पथनाट्याचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!