लोहारा (Lohara) तालुक्यातील मोघा (खुर्द) येथे अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रति वर्षीप्रमाणे याहीवर्षी हा सोहळा सद्गुरु वासकर महाराज, श्री शिवराम बुवा दिंडेगावकर, वै. ह.भ.प. संत मारुती महाराज कानेगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने व ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज अचलबेट यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान संपन्न होणार आहे. या आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी वाचन, गाथा, भजन, काकडा, हरिपाठ, भागवत कथा, कीर्तन, हरिजागर आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे. दि. २६ नोव्हेबर रोजी ह.भ.प. संभाजी मेहुनकर महाराज दिंडोरी, दि. २७ रोजी ह.भ.प. महेश महाराज माकणीकर, दि. २८ रोजी ह.भ.प. नितीन जगताप महाराज हिप्परगा कवळी, दि. २९ रोजी ह.भ.प. अर्जुन मोटे महाराज पळशी, दि. ३० रोजी हभप महादेव स्वामी महाराज बोरी सलगर, दि. १ डिसेंबर रोजी ह.भ.प. तुकाराम हजारे महाराज बेळगाव व दि. २ रोजी काल्याचे किर्तन ह.भ.प. देविदास निवळीकर महाराज महाराज निवळी यांचे होणार आहे. तर कालावाटप सेवा ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज कानेगावकर यांच्या हस्ते होणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळ व हरिहर भजनी मंडळ मोघा खुर्द यांनी केले आहे.








