Friday, October 2, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात व्याख्यान

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्ष व अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि.११) डॉ. महानंदा मोरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व महिला सबलीकरण या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अंतर्गत तक्रार निवारण समिती प्रमुख डॉ. छाया कडेकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या सदस्या डॉ. पार्वती माने यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना त्यांनी महिला दिन व महिलांचे सबलीकरण याविषयी मत मांडले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक असलेल्या भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या डॉ. महानंदा मोरे यांनी मुलींना सखोल असे मार्गदर्शन करत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व त्या अनुषंगाने मुलींची भूमिका स्पष्ट केली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वांसाठी किती महत्त्वाचे आहे. यातून मुलींनी स्वतःला सक्षम बनवून आपल्या समाज व आपल्या राष्ट्राचा विकास घडवून आणायचा आहे. त्यांनी आपल्या भाषणात भारतातील अनेक प्रतिभाशाली महिलांचे उदाहरण आणि आदर्श मुलींसमोर ठेवून त्यांनी त्यांच्यासमोर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अनेक महत्त्वपूर्ण घटकाविषयी मार्गदर्शन केले. यानंतर प्रा. डॉ. मनोज सोमवंशी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

\"\"

Tags: लोहाराशंकरराव जावळे पाटील महाविद्यालय
Previous Post

लोहारा येथील मॅरेथॉन स्पर्धेत चाकूर येथील निवृत्ती गुडेवाड प्रथम

Next Post

लोहारा तालुक्यातील खेड येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शरवीन शेख तर उपाध्यक्षपदी अश्विनी कांबळे

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा तालुक्यातील खेड येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शरवीन शेख तर उपाध्यक्षपदी अश्विनी कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!