Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

विद्यामाता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे लिटल हॅन्ड कॉन्स्टंट चॅम्पियनशिप स्पर्धेत यश

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

कोलकत्ता येथे आयोजित करण्यात आलेल्या लिटल हॅन्ड कॉन्स्टंट चॅम्पियनशिप (championship) स्पर्धेत लोहारा (lohara) तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलमधील ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी ४२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.
तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुल (vidyamata english school) मधील एलकेजी आणि युकेजी क्लासमधील ४५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यामधील ४२ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक (gold medal) व प्रमाणपत्र प्राप्त केले. तसेच ३ विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र प्राप्त केले. या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांची तयारी गीता चिकुंद्रे, सोनाली आलमले, अश्विनी वाघमारे, सबिया शेख या शिक्षकांनी करून घेतली. अत्यंत कमी वयापासून विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. लहान मुलांनी या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शक शिक्षिकांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे (हावळे ) यांच्या हस्ते करण्यात आला. शेतकरी विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जवळगे, सचिव किशोर साळुंके व ॲड. दिपक जवळगे यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे व शाळेचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

\"\"

Tags: लोहाराविद्यामाता इंग्लिश स्कुल
Previous Post

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यानी केली मतदाना बाबत जनजागृती

Next Post

मतदान केंद्राध्यक्ष व सहाय्यक केंद्राध्यक्षांना दिले मतदान यंत्र हाताळणे व मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

मतदान केंद्राध्यक्ष व सहाय्यक केंद्राध्यक्षांना दिले मतदान यंत्र हाताळणे व मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!