Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

ज्ञानज्योती महिला पतसंस्थेच्या चेअरमनपदी ॲड. आकांक्षा चौगुले व व्हाईस चेअरमनपदी सारिका बंगले यांची बिनविरोध निवड

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरातील ज्ञानज्योती महिला पतसंस्थेच्या चेअरमन पदी युवती सेना मराठवाडा निरीक्षक ॲड. आकांक्षा ज्ञानराज चौगुले व व्हाईस चेअरमनपदी सारिका प्रमोद बंगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
लोहारा शहरातील ज्ञानज्योती महिला पतसंस्थेच्या संचालक मंडळाची २०२५ – ३० साठी बिनविरोध निवड झाल्यामुळे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या निवडीसाठी शहरातील ज्ञानज्योती महिला पतसंस्थेच्या कार्यालयात सहाय्यक निबंधक तथा अध्यासी अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली दि. २ मे रोजी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. चेअरमन पदासाठी ॲड. आकांक्षा चौगुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. चेअरमन पदासाठी संचालिका तथा नगराध्यक्षा वैशाली खराडे या सूचक तर नगरसेविका सुमन रोडगे यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी सारिका बंगले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. व्हाईस चेअरमन पदासाठी संचालिका मनिषा शिंदे या सूचक तर संचालिका मुक्ताताई राजेंद्र भोजने यांनी अनुमोदन दिले. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने अध्यासी अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले. या निवडीनंतर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील शिवसेना संपर्क कार्यालयात चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, संचालिका यांचा लोहारा तालुका शिवसेना व पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी युवती सेना मराठवाडा निरीक्षक तथा पतसंस्थेच्या चेअरमन ॲड.आकांक्षा चौगुले, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, व्हाईस चेअरमन सारिका बंगले, माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, शिवसेना नेते राजेंद्र माळी, संस्थेच्या सचिव मिरा माळी, संचालिका मुक्ताताई राजेंद्र भोजणे, संचालिका सुमन दिपक रोडगे, संचालिका देवकन्या आप्पासाहेब पाटील, संचालिका मुमताज अमिन सुंबेकर, नगरसेविका शामल माळी, शिवसेना जिल्हा उप प्रमुख शब्बीर गवंडी, पं.सं. माजी सदस्य दिपक रोडगे, सदानंद शिवदे पाटील, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, इकबाल मुल्ला यांच्यासह पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक भागवत पवार, बालाजी जगदाळे, राजश्री घंटे, अनुक्षा पाटील, आनिकेत कदम, नयुम सवार, सचिन करे, शुभम सुरवसे, मारुती कोकरे, श्रीकांत बिराजदार आदी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: आकांक्षा ज्ञानराज चौगुलेज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थालोहारा
Previous Post

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

Next Post

लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा निकाल ९१.२५ टक्के

Related Posts

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

Next Post

लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा निकाल ९१.२५ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!