आपण समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना आपली गरज आहे त्यांच्यासाठी आपण धावून गेलं पाहिजे. तळागाळातील लोकांसाठी काम केलं पाहिजे. तरच समाज म्हणून आपण उन्नत होऊ असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेच्या वाघोली प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके यांनी केले.
भारतीय जैन संघटनेचा ३३ वा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा दि. २ नोव्हेंबर रोजी लोहारा तालुक्यातील माकणी येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप श्याम चैत्यन्य महाराज हे होते. या कार्यक्रमामध्ये जवळपास ३०० हून अधिक माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांनी व प्रतिष्ठित नागरिक, पालकही यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी भारतीय जैन संघटनेच्या वाघोली प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके, ह.भ.प. महेश महाराज, गुरुगोविंद नामदेव अंबे, संपत गर्जे, कल्याण अहिवळे, शशिकांत केसकर, अजित पाटील, एस.एस. पवार, राजेश्वर गौंडर, प्रवीण दोसी, अशोक पवार, हामीम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माकणी गावातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच गावातील सरकारी, निमसरकारी नोकरी मिळविलेले विद्यार्थी यांचाही सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. विविध विषयावरील व्याख्यानेही आयोजित करण्यात आलेली होती. त्यात “इन्कम अँड कंपाऊंड इफेक्ट” या विषयावरती बालाजी साठे यांनी मार्गदर्शन केले. गणेश बिराजदार यांनी “शेतकऱ्यांसाठीच्या शासकीय योजना”, योगेश कदम यांनी “महसूल विभाग अंतर्गत सर्व कामे व त्यांचे स्वरूप” या विषयावरती मार्गदर्शन केले. विष्णु शिंदे यांनी फाउंडेशनच्या सामाजिक कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी गुणवंत विद्यार्थी अवंती रणदिवे, साक्षी कलशेट्टी, भक्ती वाघमारे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच गावातील यशस्वी विद्यार्थी अक्षय साठे, विष्णु शिंदे, नामदेव कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, दिनेश राजपूत, बाळू कांबळे, शाहूराज परतापुरे, बालाजी यादव, सना शेख, अजित कोरडे यांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी माकणीतील माजी विद्यार्थी वैजिनाथ ढोणे, लिंबराज साठे, धनंजय जानकर, विठ्ठल ओवांडकर, रणजीत साठे, सचिन परतापुरे, सतिश ढोणे, प्रमोद ढोणे, मधुकर सगर, मनोज राजपूत, नामदेव कोळी, सोमनाथ साठे, राजाराम भोई, संतोष सूर्यवंशी, बालाजी साठे, रामदास कांबळे, रंगनाथ ढोले, महादेव शिंदे, प्रशांत साठे, संतोष पवार, नामदेव साठे, मारुती वाघमारे, नितीन मडोळे, प्रताप साठे, विठ्ठल माने, हणमंत साठे यांच्या उत्स्फूर्त प्रयत्नातून कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद चौरे व महेश शिंदे यांनी केले. गोवर्धन रणदिवे यांनी आभार मानले.