Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मित्राने केला बालमित्राच्या कार्याचा गौरव – जेवळी येथे पुस्तक प्रकाशन व मानव विकास केंद्राचे उद्घाटन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
22/04/2024
in लोहारा तालुका
A A
0
मित्राने केला बालमित्राच्या कार्याचा गौरव – जेवळी येथे पुस्तक प्रकाशन व मानव विकास केंद्राचे उद्घाटन
Ad 10

पुरोगामी विचारांची कास धरून आपले जीवन गोरगरीब व गरजू लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी घालवलेला बालपणीच्या मित्राचे अचानकपणे निधन झाले. त्या बालमित्राच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळावी यासाठी पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचे प्रकाशन व मानव विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.
तालुक्यातील जेवळी येथे शनिवारी (दि.२०) हा कार्यक्रम पार पडला. डॉ. सत्तेश्वर पाटील यांचे जेवळी हे आजोळ होते. याच ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी त्यांच्या जीवन प्रवासात मित्रत्वाचे नाते व वैद्यकीय सेवेत माणुसकीचे दर्शन देत निस्वार्थ कार्य केले होते. लहानपणीच्या मित्राची आठवण सदैव स्मरणात राहावी यासाठी साहित्यिक बाबुराव माळी यांनी आपला सत्येश्वर या पुस्तकाचे लिखाण केले. बालमित्राच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिले. या कार्यक्रमात आपला सत्तेश्वर या पुस्तकाचे प्रकाशन व डॉ. सत्तेश्वर पाटील मानव विकास केंद्राचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या काही वर्षापासून विद्या विकास प्रतिष्ठान च्या माध्यमातून गरजवंत विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा विडा उचलला जात आहे. याच सामाजिक संस्थेला जोड म्हणून जेवळी गावात डॉ. सत्तेश्वर पाटील मानव विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सत्येश्वर पाटील यांना ज्ञानार्जन केलेले शिक्षक शंकर अरबळे, डॉ. सत्येश्वर पाटील यांची पत्नी उषा पाटील, साहित्यिक विश्वास धुमाळ, कार्यकारी संचालक रविकांत पाटील, प्रशासकीय प्रमुख अश्विनी हॉस्पिटल सोलापूर डॉ. राजेंद्र घुली, डॉ. सुचित्रा पाटील, प्राजक्ता पाटील, बालमित्र, निवृत्त शिक्षक बाबुराव माळी, विद्या विकास प्रतिष्ठानचे भारत काळे, महेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सत्तेश्वर पाटील यांच्या बालपणीच्या आठवणींना व कार्याला उजाळा देत त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रामधील कार्याचा गवगवा आपल्या अध्यक्षीय भाषणात शंकर अरबळे यांनी केला. तसेच रविकांत पाटील, डॉ. सुचित्रा पाटील यांनीही विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास जेवळी गावातील डॉ. सत्येश्वर पाटील यांच्या बालमित्रांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. डॉ. सत्येश्वर पाटील यांच्या जीवनकार्यावर पुस्तकाचे लिखाण करून मित्रांचे आचार विचार समाजाप्रती मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे बालमित्र निवृत्त शिक्षणाधिकारी तथा साहित्यिक बाबुराव माळी यांचा पाटील कुटुंबातर्फे सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. सत्येश्वर पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा वसा डॉ. सत्येश्वर पाटील मानव विकास संस्थेच्या माध्यमातून समाजाप्रती सामाजिक कार्य सदैव करत रहावे असे मत प्राजक्ता पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी साहित्यिक विश्वास धुमाळ यांनी डॉ. सत्येश्वर पाटील यांच्या जीवनातील प्रवासावर शब्दबद्ध केलेली कविता शरणाप्पा कोरे गुरुजी यांनी साद चढवली. या प्रसंगी मात्र संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक बाबुराव माळी यांनी केले. सूत्रसंचलन रामकृष्ण पाटील यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येत बालमित्र पाटील कुटुंब तसेच विद्याविकास प्रतिष्ठानचे भारत काळे, महेश क्षीरसागर, सह पदाधिकारी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उद्घाटनजेवळीलोहारा
Previous Post

ॲड. आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी कानेगाव येथे जाऊन घेतली लोभे कुटुंबीयांची भेट – कुटुंबियांना दिला धीर

Next Post

हनुमान जयंतीनिमित्त उंडरगाव येथे पाच दिवसीय यात्रा महोत्सव

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
हनुमान जयंतीनिमित्त उंडरगाव येथे पाच दिवसीय यात्रा महोत्सव

हनुमान जयंतीनिमित्त उंडरगाव येथे पाच दिवसीय यात्रा महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's