Vartadoot
Tuesday, September 15, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट

मुख्य संपादक by मुख्य संपादक
08/08/2026
in लोहारा तालुका
A A
0
आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट
Ad 10

उमरगा-लोहारा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रविण स्वामी यांनी लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, एकोंडी (लो) येथे सदिच्छा भेट देऊन शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम, ओपन जिम, इनडोअर जिम, आकर्षक परसबाग, बोलक्या भिंती, शालेय रंगरंगोटी, वृक्षारोपण व संवर्धन तसेच विद्यार्थ्यांकडून राबविण्यात येणारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. अवघ्या दहा महिन्यांत शाळेचा झालेला आमूलाग्र बदल पाहून त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. आमदार स्वामी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व विशद केले. तसेच नासा परीक्षेत यश मिळविलेल्या रुद्र संदीपान सूर्यवंशी व राणाजगजित प्रविण पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेच्या वतीने आमदार प्रविण स्वामी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.


आपल्या मनोगतात आमदार स्वामी यांनी “मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा” अभियानांतर्गत शाळेने केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत, शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. एन. आयलाने तसेच शिक्षक श्री. व्ही. आर. सूर्यवंशी, श्री. पी. एस. गुडले, श्रीम. पी. के. येदले आणि श्रीम. एस. ए. मलकलपटे यांच्या परिश्रमांचे अभिनंदन केले. शाळेने अल्पावधीत केलेली प्रगती ही इतर शाळांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या भेटीमुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आमदारांच्या या सदिच्छा भेटीमुळे शाळेच्या गुणवत्तावृद्धीस अधिक बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी गावच्या सरपंच सौ. सुलक्षणाताई सूर्यवंशी, उपसरपंच विकास पाटील, ग्रामविकास अधिकारी महादेव जगताप, प्रविण पाटील, रवी पाटील, बाबा सूर्यवंशी, संदीपान सूर्यवंशी, शिवाजी कांबळे, माधव पाटोळे, संग्राम फटाटे, व मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार प्रवीण स्वामीएकोंडी (लो)
Previous Post

हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर

Next Post

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

Related Posts

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात
लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

15/09/2026
लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प
लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

10/09/2026
जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी
लोहारा तालुका

जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी

08/09/2026
खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी
लोहारा तालुका

खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी

08/09/2026
माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ
लोहारा तालुका

माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ

06/09/2026
माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा

06/09/2026
Next Post
लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's