दि प्राईड इंडिया स्पर्श रुग्णालय संचलित आणि कॅप्री लोन यांच्या सौजन्याने मोबाईल मेडिकल युनीटच्या माध्यमातून करजखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यासाठी रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी अच्युत आदटराव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व सदृढ आरोग्याचे धडे दिले. तर डॉ. वैशाली कुलकर्णी यांनी मानवी शरीरात रक्ताचे महत्त्व याविषयी माहिती विशद केली. सदर शिबिरात एकूण १९८ विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासण्यात आले. यावेळी सुदर्शन माळी, अथर्व कुलकर्णी, पल्लवी सोनकांबळे, ज्ञानेश्वर लोंढे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. सूत्रसंचालन श्री. प्रताप मते यांनी तर मुख्याध्यापक हनुमंत दबडे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रताप यादव, मुनाळे सर, विष्णू माने, सतीश कदम, भारत आडगळे, संजय आदटराव, रवींद्र माने, रामभाऊ कारजवळगे, घाटे मॅडम, लोकरे मॅडम, मरफळे मॅडम यांनी परिश्रम घेतले.