Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अयोध्यातून आलेल्या अक्षता कलशाची जेवळी येथे शोभायात्रा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
11/01/2024
in लोहारा तालुका
A A
0
अयोध्यातून आलेल्या अक्षता कलशाची जेवळी येथे शोभायात्रा
Ad 10

अयोध्येतील (Ayodhya) भव्य मंदिरात श्री प्रभू रामचंद्राच्या मृर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्ताने अयोध्यातून आलेल्या अक्षता कलशाची तालुक्यातील जेवळी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी परिसरातील भाविक भक्तांच्या मोठ्या प्रमाणात सहभागाने गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
अयोध्येतील भव्य मंदिरात २२ जानेवारीला श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडत आहे. त्यानिमित्ताने अयोध्या येथून अभिमंत्रित होऊन आलेल्या अक्षता कलशाचे मंगळवारी तालुक्यातील जेवळी येथे शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत जेवळीसह दक्षिण जेवळी, रुद्रवाडी, हिप्परगा (सय्यद), तुगाव, मोघा, फनेपूर, वडगाव, भोसगा आदी गावातील भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी भगवे पताके, श्रीरामाचा उल्लेख केलेले उपरणे व डोक्यावर टोप्या घालून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने गाव भक्तीमय व भगवेमय झाले होते. यावेळी ठिकठिकाणी घरासमोर सडा- रांगोळी घालून या अक्षता कलश दिंडीचे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी रथावर आरूढ झालेले श्रीराम सीता बरोबरच रामायणातील विविध व्यक्तिरेखा साकारली होती.

शोभायात्रा
याप्रसंगी परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या अक्षता कलश दिंडीचा शुभारंभ उपसरपंच बसवराज कारभारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी दंडगुले, माजी उपसरपंच भोजप्पा कारभारी, सुभाष बिराजदार, युवा सेनेचे तालुका उपप्रमुख शिवराज चिनगुंडे, कॉंग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गाडेकर, ग्रा. पं. सदस्य नागेश पणुरे, महादेव कारभारी, सुरेश दंडगुले आदींची उपस्थिती होती. यावेळी गावात घरोघरी जाऊन अक्षता, श्रीराम फोटो आणि पत्रांचे वाटप करण्यात आले. शेवटी येथील श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठात या दिंडीची समारोप झाला. उपस्थित भाविक भक्तांना सुभाष मडोळे यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आला. यावेळी जेवळी येथील कारसेवक परमेश्वर तोरकडे, सुरेश भुसाप्पा, सुधीर कोरे व सहभागी भजनी मंडळींचे मठाधीश म.नी.प्र श्री गुरु गंगाधर महास्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वैजीनाथ पाटील, हभप कमलाकर कोळी, हभप हरी गाडेकर, चंद्रकांत ढोबळे, सिद्राम भुसाप्पा, आणप्पा बिराजदार, महेश सुरवसे, सत्तेवर ढोबळे, रवी घोडके, रविराज सोळसे, पृथ्वीराज कारभारी, शिवाजी फुलसुंदर, शहाजी जाधव, दत्तात्रय पोतदार, युवराज जाधव, जगदीश बेडगे, मनोहर माळी, संजय पोतदार, वैजीनाथ सोळसे, रोहीत कारभारी, रमेश मुरमे, महादेव हावळे, भीमाशंकर कलशेट्टी, अनिल भैरप्पा आदी

शोभायात्रा

उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अरूण हावळे, किशोर होनाजे, बालाजी चव्हाण, श्रीशैल बिराजदार, सुधीर कोरे, वैजीनाथ होनाजे, सुरेश डिग्गे, शैलेश नकाशे, नंदकुमार वेदपाठक, चेतन शिंदे, शंकर साखरे आदींनी परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अयोध्याजेवळीशोभायात्रा
Previous Post

महामार्गावरील अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करूनच काम सुरू करा – सुरेशदाजी बिराजदार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

Next Post

लोहारा शहरासह तालुक्यात वेळअमावस्या सण साजरा

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
लोहारा शहरासह तालुक्यात वेळअमावस्या सण साजरा

लोहारा शहरासह तालुक्यात वेळअमावस्या सण साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's