Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

महामार्गावरील अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करूनच काम सुरू करा – सुरेशदाजी बिराजदार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

by मुख्य संपादक
in आपला जिल्हा
A A
0

उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मागील आठ वर्षांपासून अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांच्या गंजलेल्या सळ्याचे (स्ट्रक्चरल ऑडिट) प्रशासकीय तपासणी करून परवानगी नंतरच काम सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी बुधवारी (दि.१०) जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच यावेळी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ चे काम मागील आठ वर्षांपासून संथ व निकृष्ट दर्जाचे होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अनेक आंदोलनेही करण्यात आली आहेत. महामार्गाच्या उड्डाण पुलांची कामे मागील अनेक वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहेत. पुढील कामासाठी सोडण्यात आलेल्या सळ्या अनेक वर्षांपासून उघड्या असल्याने वातावरणाच्या परिणामामुळे गंजून कुजलेल्या आहेत. यावरच पुढील काम केल्यास भविष्यात मोठा धोका होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. संबंधित कंत्राटदार व महामार्ग प्राधिकरण असे निकृष्ट काम रेटून पूर्ण करण्याचा घाट घालत आहे.

\"\"\"\"
सदरील उमरगा, लोहारा, तुळजापूर व जिल्ह्यातील अर्धवट स्थितीतील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सर्व उड्डाण पुलांच्या कामांचे (स्ट्रक्चरल ऑडिट) त्रयस्थ संस्था व प्रशासनाकडून केल्यानंतर व अधिकृत परवानगी घेऊनच करण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या जीवितहानीच्या धोक्यास व होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच ही

\"\"

जीवघेणी कामे थांबली नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी पदवीधर विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन बागल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, तालुका उपाध्यक्ष विराट पाटील आदी उपस्थित होते. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी तात्काळ नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाचे प्रोजेक्ट डायरेक्टर यांना याबाबत सूचना दिल्या.

Ad 2
Ad 1
Tags: जिल्हाधिकारी सचिन ओंबासेसुरेशदाजी बिराजदार
Previous Post

धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलने केली १९ पदकांची कमाई..

Next Post

अयोध्यातून आलेल्या अक्षता कलशाची जेवळी येथे शोभायात्रा

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

अयोध्यातून आलेल्या अक्षता कलशाची जेवळी येथे शोभायात्रा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!