लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील जि. प. प्रा. शाळेत शनिवारी (दि.११) कौशल्य विकास बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्याचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात विविध खाद्य पदार्थाचे एकूण तीस दुकाने मुलांनी उभी केली होती. या मेळाव्यातून मुलांनी उद्योगी बनावे, मुलांना पैसे कमावताना किती कष्ट करावे लागतात याची जाणीव व्हावी, व्यावहारिक ज्ञान वाढावे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित युवराज तोडकरी व भरत गंगणे यांच्याकडून प्रत्येकी २५० रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या मेळाव्यात तब्बल पंचेविस हजाराची उलाढाल झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोहारा केंद्राचे केंद्रप्रमुख विश्वजीत चंदनशिवे तर व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बालाजी माने, शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार माळवदकर, शाळेतील शिक्षक इस्माईल तांबोळी, आसिफा सय्यद, जयश्री वाघमारे, विकास घोडके, पोलीस पाटील नीलकंठ कोठावळे, ज्ञानेश्वर गंगणे, श्रीकृष्ण गंगणे, युवराज तोडकरी, प्रदीप ढोबळे, विश्वास ढोबळे, हिराचंद मोरे, हरी पवार, नेताजी सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी व गावातील महिला पालक, सर्व शिक्षण प्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित राहून विविध रुचकर पदार्थांचा आनंद घेतला. सूत्रसंचालन युसूफ पटेल यांनी तर रफिक शेख यांनी आभार मानले.
