लोहारा तालुक्यातील माकणी येथे ग्रामपंचायत कार्यालय माकणी व मोरे कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१२) राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त खुल्या राज्यस्तरीय जवाहर नवोदय विद्यालय सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
इयत्ता पाचवी वर्गातील नवोदय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी ही सराव परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना उत्तम सराव व्हावा, तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती कमी व्हावी, नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड व्हावी या हेतूने नवोदय परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रविवारी सकाळी ११ ते १ या दरम्यान भारत विद्यालय माकणी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माकणी, सरस्वती विद्यालय माकणी या केंद्रावर होणार आहे. परीक्षेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रु. ५०००/- व चषक, द्वितीय रु. ४०००/- व चषक तर तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यास रु. ३०००/- व चषक बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच याव्यतिरिक्त अनेक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी दि. ११ जानेवारीपर्यंत
1) श्री समाधान मोरे सर
9637335464
2) श्री शिवाजी पोतदार सर
9011889956
3) श्री गौरीशंकर कलशेट्टी सर
9422116541
4) श्री अविनाश देशमुख सर
8378829663
संपर्क साधून शंभर रुपये नोंदणी शुल्कासह नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.