वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभागास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून राज्यशास्त्र विषयाच्या पीएच. डी. संशोधन केंद्रास नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. जिल्हयातील राज्यशास्त्र विषयाचे हे पहिले व एकमेव संशोधन केंद्र असल्याने ग्रामीण भागातील नवसंशोधकाला व संशोधन मार्गदर्शकांची यामुळे उत्तम सोय झाली आहे. राज्यशास्त्र विषयामध्ये अधिक गुणात्मक व दर्जात्मक संशोधनाला या केंद्रामुळे चालना व वाव मिळणार आहे. राज्यशास्त्र संशोधन केंद्र मिळाल्याबद्दल राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सायबण्णा घोडके, प्रा. डॉ. महेश मोटे यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार आदींनी त्यांचे कौतुक करून विशेष अभिनंदन केले.