वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथील अशिष एकनाथ शिंदे व पार्थ मलिकार्जुन कलशेट्टी या दोन विद्यार्थ्यांची व मार्गदर्शन शिक्षक म्हणून मल्लीकार्जुन कलशेट्टी यांची सलाम मुंबई फाऊंडेशनने २३ जिल्ह्यासाठी आयोजित केलेल्या बाल परिषदेसाठी निवड झाली आहे. त्यात विद्यार्थ्यांची संवाद कौशल्य, सवयीची जडणघडण करण्याचे कौशल्य, शाळा स्तरावरील बाल पंचायत भूमिका व जबाबदारी, विद्यार्थ्यांच्या शाळेतील जबाबदारी व बोलण्याचे कौशल्य या अनेक विषय घेऊन या बाल शिक्षण परिषदेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. देशातील व्यसनाधीनतेचे प्रमाण व त्याचे दुष्परिणाम या गोष्टीची देखील माहिती यामध्ये सांगितले जाणार आहे व तंबाखू खाल्ल्याने शरीरावर होणारे परिणाम व आपले गाव तंबाखूमुक्त कसे करता येईल यासाठी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
या बाल परिषदेसाठी समावेशित असलेल्या अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वाशिम, बुलढाणा, अकोला, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, सातारा, पुणे या प्रत्येक जिल्ह्यांमधून दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शकाच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षित करण्यात येऊन त्यांच्याकडून नवीन बदलाची अपेक्षा केली जाणार आहे. ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समितीने या विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. या दोन विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी, शिक्षक अनंत कानेगावकर, सिजर मोरवे, मल्लिकार्जुन कलशेट्टी, सुनंदा निर्मळे यांचे मार्गदर्शन मार्गदर्शन लाभले.