वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील नागरिकांना पाण्याची सोय व्हावी यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरात १५ विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक, नागरिकांच्या उपस्थितीत या विंधन विहिरीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
शहरातील नागरिकांना पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून या विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. शहरात विविध प्रभागात एकूण १५ विंधन विहिरी देण्यात आल्या आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, दहा, अकरा, तेरा, चौदा व प्रभाग क्रमांक १५ मध्ये या विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत. याचा शुभारंभ नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक, नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, शिवसेनेच्या गटनेत्या सारिका प्रमोद बंगले, अर्थ व बांधकाम व समिती सभापती गौस मोमिन, दिवाबत्ती व स्वच्छता समिती सभापती सुमन दिपक रोडगे, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते जालिंदर कोकणे, नगरसेविका कमल भरारे, अभिमान खराडे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक अविनाश माळी, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, नगरसेवक अमिन सुंबेकर, ओम कोरे, शिवसेना माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, जगदिश लांडगे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, भगवान मक्तेदार, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, बाळासाहेब पाटील, उमाकांत भरारे, प्रकाश भगत, शंकर जटटे, बाळासाहेब लांडगे, निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, इकबाल मुल्ला, महेबुब फकिर, जसवंतसिंह बायस, रघुवीर घोडके, चेतन बोंडगे, सादिक फकीर, दयानंद स्वामी, राहुल जाधव आदींसह नागरिक उपस्थित होते.