वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील शंकरराव जावळे-पाटील महाविद्यालयास नॅककडून ‘बी प्लस’ मानांकन मिळाल्याबद्दल फिनिक्स कॉम्प्युटर सेंटरच्या वतीने संचालक मारूती लोहार यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
मागील आठवड्यात राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) समितीचे अध्यक्ष ओरिसा येथील फकीर मोहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भगवान दास, समन्वयक म्हणून गुहाटी येथील प्रा. ग.जोतिष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कुमार महंता यांनी शहरातील शंकरराव जावळे-पाटील महाविद्यालयास दोन दिवसीय भेट दिली होती. महाविद्यालयातील भौतिक व शैक्षणिक सोयी सुविधांची पाहणी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक पाटील यांच्याकडून महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती पीपीटीद्वारे जाणून घेतली. महाविद्यालयाच्या सोयीसुविधाबाबात समाधान व्यक्त करून नॅक समितीने नॅक समितीने शंकरराव जावळे-पाटील महाविद्यालयास ‘बी प्लस’ मानांकन दिले.
शंकरराव जावळे-पाटील महाविद्यालयास बी प्लस’ मानांकन मिळाल्याबद्दल शहरातील फिनिक्स कॉम्प्युटर सेंटरचे संचालक मारूती लोहार यांच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक पाटील यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी एमकेसीएलचे उस्मानाबाद जाहिरातप्रमुख अविनाश पांचाळ, डॉ. प्रा. आर. एम. सूर्यवंशी, शिरीष देशमुख, नंदकिशोर माने आदी उपस्थित होते.