लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील श्री बालाजी विद्यालयात शुक्रवारी (दि.१०) बाल आनंद मेळावा घेण्यात आला. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी जवळपास पाच हजार रुपयांची कमाई केली.
तालुक्यातील तावशीगड येथील श्री बालाजी विद्यालयात हा बाल आनंद मेळावा घेण्यात आला. या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे माजी संचालक सुभाष मिटकरी यांनी रिबीन कापून केले. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भेळ, पाणीपुरी, मिसळपाव, इडली सांबर, अप्पे, भजे, समोसे, सुकी भेळ, चिवडा, सँडविच, वेज पुलाव, मोमोज, गुलाबजामून इत्यादी पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. यातून विद्यार्थ्यांनी जवळपास पाच हजार रुपये कमई करण्यात आली. विद्यार्थी विक्रेत्यांना गावातील व शाळेतील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी गावातील पालक, माजी विद्यार्थी, प्रतिष्ठीत नागरिक तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका उषा गवारे, शिक्षक एस.बी. पटवारी, पि.के. निंबाळकर, बी.ए. घंटे, ए.एस. वाघमारे, माजी विद्यार्थी लक्ष्मण बिराजदार, कर्मचारी सेवक मारुती मिटकरी व गावातील शाहूराज दंडगुले, शांताबा मिटकरी, शौकत अली मासूलदार, गजानन मिटकरी, संजय दंडगुले उपस्थित होते.