सध्या सर्वत्र दीपावली सण उत्साहात साजरा होत आहे. अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत येऊन शेतकऱ्यांच्या दिवाळी सणावर निराशेचे सावट असले तरी नोकरदार व कमावत्या वर्गाने बेफाम फटाके वाजवून धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली आहे.
अशा परिस्थितीत उपेक्षित असलेल्या लोहारा तालुक्यातील होळी येथील शेतकरी महिलांसोबत भाऊबीज साजरी करण्याचा अनोखा उपक्रम येथील ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनने राबविला आहे.

ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशच्या वतीने होळी येथील शेतकरी महिलांना वस्त्र भेट देऊन फाउंडेशनच्या भावांनी बहिणीकडून आशीर्वाद घेतले. यावेळी “आम्हाला चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करण्यासाठी व कष्टकऱ्यांच्या न्याय्य-हक्कासाठी लढण्याकरीता महिला भगिनींच्या आशीर्वादाने बळ मिळावे.” अशी भावना ऍड. शीतल चव्हाण यांनी व्यक्त केली. याप्रसंगी फाउंडेशनचे सत्यनारायण जाधव, ईश्वर नांगरे, करीम शेख, प्रदीप चौधरी, करण बाबळसूरे, किशोर बसगुंडे, विजय चितली आदी पदाधिकाऱ्यासह शेतकरी महिला उपस्थित होत्या.














