लोहारा तालुक्यातील मार्डी येथील जिल्हा परिषद शाळेत माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
तालुक्यातील मार्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकाचे वाचन केले. यावेळी मुख्याध्यापक व शिक्षकांनी वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. मुख्याध्यापक सुरेश वाघमोडे, शिक्षिका वर्षा चौधरी, महानंदा चव्हाण, कैलास माणिकशेट्टी, यु.एस. बनकर, आर.डी. खटके, विनोद कांबळे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले.














