कार्तिक पोर्णिमेनिमित्त लोहारा ते कपिलधार पायी दिंडीला मंगळवारी (दि.२८) सुरुवात झाली आहे. संत शिरोमणी मन्मथ माऊलीच्या मुर्तीला रुद्राभिषेक करुन रथाची पुजा करुन पायी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहारत दिंडी रथ व पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
डॉ. शांतबीरलिंग शिवाचार्य महाराज औसा, सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने संगित शिवकथाकार कुमारसागर महाराज लोहारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही पायी दिंडी निघाली. सर्व प्रथम लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात रथ व पालखीचे पुजन आ. प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष आयुब शेख, माजी सरपंच नागण्णा वकील, शंकर जट्टे, सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय बिराजदार, मुख्याध्यापक दत्ता फावडे, शालेय समिती अध्यक्ष हरी लोखंडे, वेदमूर्ती संगन्ना स्वामी, रौफ बागवान, ओम कोरे, प्रमोद बंगले, संतोष फावडे, बसवराज वकील, पंचय्या स्वामी, बसवराज तोडकरी, बसवराज बिडवे, उमाशंकर जट्टे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महात्मा बसवेश्वर मंदीरात महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.













