Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

डॉ. धनाजी थोरे यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार\’

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील माकणी येथील भारत शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा इंग्रजी विषयाचे अभ्यासक डॉ. धनाजी थोरे यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व विद्यार्थीहिताच्या उल्लेखनीय कार्याबद्दल इंडियन स्टुडंट्स कौन्सिलच्या वतीने राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. चिपळूण येथे दि. १६ ऑगस्ट रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात भारत सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते डॉ. थोरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. धनाजी थोरे यांनी शिक्षण क्षेत्रात अध्यापनासोबतच विद्यार्थी विकास, सामाजिक जाणीव, साहित्य-संस्कृती, संशोधन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. इंग्रजी साहित्याचे अभ्यासक म्हणून त्यांनी भारतीय साहित्य, समाज, संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांचा परस्परसंबंध अधोरेखित करणारे विविध संशोधनपर उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, स्पर्धात्मक परीक्षांची जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्याबरोबरच विद्यार्थी-केंद्रित विविध उपक्रमांना चालना दिली. राष्ट्रीय तसेच सामाजिक विषयांवरील व्याख्याने, चर्चासत्रे, विद्यार्थी विकास कार्यक्रम आणि जनजागृतीपर उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत इंडियन स्टुडंट्स कौन्सिलने त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली. राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक समता, शिक्षणप्रसार आणि वंचित घटकांच्या उन्नतीच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे डॉ. थोरे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याची तसेच माकणी महाविद्यालयाच्या शैक्षणिक योगदानाची राज्यस्तरीय दखल मानली जात आहे.

\"\"


विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षण प्रभावीपणे देण्यासाठी भविष्यातही कार्यरत राहण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. हा पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सिनेअभिनेते श्रीरंग गोडबोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हुसेन दलवाई होते. यावेळी भास्करराव जाधव, उमेश सकपाळ, अविनाश महातेक, अभिजीत हेगशेट्ये, प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम, प्रा. माधुरी राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. धनाजी थोरे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय माने, आयक्यूएसी समन्वयक डॉ. वैभव पतंगे, नॅक समन्वयक डॉ . किरण लोमटे, कॉलेज प्रसिद्धी प्रमुख डॉ. अतुल बिराजदार, कार्यालयीन अधीक्षक किशोर जगताप, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

\"\"
Tags: माकणीलोहारा तालुका
Previous Post

एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड

Next Post

लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!